स्व.भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्काराने ज्येष्ठ साहित्यिक प्रा.भास्कर चंदनशिव सन्मानित

चंदनशिव यांच्या कथेने नवी दृष्टी देत गावगाडा, कृषिजन कवेत घेवून नैतिकता जोपासली - प्रख्यात साहित्यिक प्रा.राजन गवस ========================= अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क) भास्कर चंदनशिव यांच्या व्यक्तिमत्त्वावर अंबाजोगाईच्या संस्कारांचा प्रभाव आहे. त्यांचे लोमटे बापू आणि अंबाजोगाईवर नितांत प्रेम आहे. म्हणी, वाक्प्रचार, लोकगीते, ओव्या हे ज्ञान संक्रमणाचे शास्त्र आहे. यातून तत्कालीन कृषि समाजाने संदेश दिलेला आढळतो. मराठी साहित्य गावखेड्यात नेण्याचे काम चंदनशिव यांनी केले. त्यांच्या साहित्यात बोलीभाषेचा सहज व विपुल वापर आढळतो. त्यामुळे ते संपूर्ण गावगाड्याचे लेखक आहेत. मापदंड आहेत. स्वतःचे अस्तित्व सिद्ध करणारी, चंदनशिव यांची कथा आहे. त्यांच्या कथेने वाचकांना नवी दृष्टी दिली. गावगाडा, कृषिजन कवेत घेवून नैतिकता जोपासली, चंदनशिव यांनी आयुष्यात कुठलीच तडजोड न करता, प्रसिद्धीसाठी मुंबई, पुणे याला प्राधान्य न देता कळंब येथे राहून नव्या पिढीला बाणेदारपणा शिकवला, मराठी साहित्यात चंदनशिव यांचा आदरयुक्त धाक आहे. असे गौरवोद्गार काढून प्रख्यात साहित्यिक प्रा.राजन गवस...