भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे अंबाजोगाई तालुका सचिव सनी वाघचौरे यांच्याकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप



रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) अंबाजोगाईचे तालुका सचिव सनी वाघचौरे यांचा कौतुकास्पद उपक्रम

==============================================

अंबाजोगाई / रणजित डांगे (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त शहरातील जिल्हा परिषद कन्या शाळा (बुरूज) येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे अंबाजोगाई तालुका सचिव सनी वाघचौरे यांनी शनिवार, दि. 8 एप्रिल 2023 रोजी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊ वाटप केले.



या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनोद घोळवे तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते संजय गंभीरे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे मराठवाडा उपाध्यक्ष अभियंता एन.डी.शिंदे, जिल्हा परिषद कन्या शाळेचे मुख्याध्यापक हनुमंत कदम, योगेश्‍वरी पॉलिटेक्नीक कॉलेजचे प्रा.संकेत तोरंबे, ज्येष्ठ नेते विष्णु वाघचौरे, आयोजक सनी वाघचौरे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. 


प्रारंभी उपस्थिती मान्यवरांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त प्रतिमेस अभिवादन केले. यावेळेस कार्यक्रमाचे आयोजक तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) अंबाजोगाईचे तालुका सचिव सनी वाघचौरे यांच्याकडून आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जिल्हा परिषद कन्या शाळा (बुरूज) येथील विद्यार्थ्यांना रजिस्टर, वही हे शालेय साहित्य आणि खाऊ वाटप केले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी तालुका सचिव सनी वाघचौरे, जितेश जाधव, ऋषी जाधव, शफिक शेख, सचिन वाघमारे, शुभम तरकसे, शाम मस्के, प्रविण दासुद, राजपाल वाघचौरे यांनी पुढाकार घेतला. यावेळेस जिल्हा परिषद कन्या शाळा (बुरूज) येथील शिक्षक, शिक्षीका, विद्यार्थीनी यांची उपस्थिती होती.


==============================================


Comments

Popular posts from this blog

भाजपाने अदानीच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय जनतेला लुटून भुकेकंगाल केले - राजेसाहेब देशमुख

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड