अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने परळीत गौरव सत्कार सोहळ्याचे आयोजन
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या गौरव सत्कार सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण, परळी शहराध्यक्ष शिवाजी देशमुख यांचे आवाहन
=======================================
अंबाजोगाई /संपादक : रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्ताने उत्कृष्ट सामाजिक काम करणाऱ्या मान्यवरांचा गौरव सत्कार सोहळ्याचे आयोजन गुरूवार, दि. १३ एप्रिल २०२३ रोजी करण्यात आले असून या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण व परळी शहराध्यक्ष शिवाजी देशमुख यांनी केले आहे.
परळी वैजेनाथ येथे गुरूवार, दि.१३ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता गणेश मंदिर, गणेशपार येथे हा गौरव सत्कार सोहळा होणार आहे. या कार्यक्रमात समाजातील वंचित, कष्टकरी यांच्यासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यथोचित गौरव करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण व परळीचे शहराध्यक्ष शिवाजी देशमुख यांनी केले आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने परळीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
===============================================
Comments
Post a Comment