प्राचार्य स्व.बी.के.सबनीस राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अहमदनगरच्या न्यु.कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाच्या संघाने पटकावले प्रथम पारितोषिक तर परभणीच्या विधी महाविद्यालयास व्दितीय पारितोषिक
प्राचार्य स्व.बी.के.सबनीस राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत 34 महाविद्यालयांच्या स्पर्धकांचा सहभाग
========================
अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
योगेश्वरी शिक्षण
संस्था संचलित स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाच्या वतीने स्व.प्राचार्य बी.के.सबनीस राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सांघिक स्वरूपाचे प्रथम पारितोषिक (दहा हजार रूपये स्मृतीचिन्ह) अहमदनगरच्या कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय
द्वितीय पारितोषिक परभणीच्या शिवाजी महाविद्यालय यांना सात हजार रूपये रोख तृतीय पारितोषिक लातूरच्या राजश्री शाहू महाविद्यालय पाच हजार रूपये रोख उत्तेजनार्थ नांदेडच्या यशवंत चव्हाण महाविद्यालय तीन हजार रूपये रोख आणि यातील वैयक्तिक पारितोषिके कुणाल बेदरे (शिवाजी महाविद्यालय, परभणी), रोहन चव्हाण (बलभीम महाविद्यालय, बीड), जनार्दन उजगरे नगर, उत्तेजनार्थ प्रवीण काजळे आदींना माजी कोषाध्यक्ष हरीश देशपांडे, उपाध्यक्ष एस.टी.कराड, निवृत्त उपप्राचार्य पी.एस.कुलकर्णी यांच्या हस्ते देण्यात आले. प्रारंभी स्पर्धेचे उद्घाटन योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेशराव खुरसाळे सेवानिवृत्त प्राचार्य के.आर.बंग आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. स्पर्धेत एकूण 34 महाविद्यालयांचे स्पर्धक सहभागी झाले होते. भारतीय संविधान आणि हिंदू राष्ट्र, हवामान बदल जागतिक राजकारण, शेतकरी आत्महत्या कारणे आणि उपाय माध्यमाची भूमिका समकालीन वास्तव, डिजिटल इंडिया अपेक्षा आणि वास्तव तसेच नवीन शैक्षणिक धोरणाची फलश्रुती आदी विषय स्पर्धेसाठी ठेवण्यात आले होते. प्रा.नयनकुमार आचार्य,प्रा.भगवान शिंदे, नाथराव गरजाळे, भागवत मसने, प्रा.उर्मिला परळीकर यांनी परीक्षक म्हणून काम पहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.पी.आर.थारकर यांनी केले. स्पर्धा आयोजना मागील भूमिका प्रा.रमेश सोनवळकर यांनी विषद केली., तर परिचय प्रा.सविता बुरांडे यांनी करून दिला. सुञसंचालन प्रा.डॉ.संपदा कुलकर्णी यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.शैलजा बरूरे यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले.
=========================
Comments
Post a Comment